Skip to main content

एक अघोरी करार- पार्ट १


        एक अघोरी करार- पार्ट १

बऱ्याच महीने आधी झी मराठी हा एक असा चॅनल होता जो मराठी प्रेक्षकांत प्रचंड लोकप्रिय होता आणि बार्क च्या ट्रेडिंग नुसार महाराष्ट्रात त्याला दूर दूर पर्यंत कोणी स्पर्धक नव्हता.. "चला हवा येउ द्या" हा शो तर टीआरपी चा नवा विक्रम रोज बनवत होता... झी चे स्वतःचे सिनेमे प्रदर्शित होत आणि त्यांनाही प्रचंड यश मिळत होतं. कुठल्याही कॉर्परेट कंपनीला हेवा वाटेल असा उत्पनाचा नवा नवा विक्रम झी मराठी रोज बनवत होतं... पण ह्या सगळ्याला नजर लागली कुणाची तरी.. झी मराठी चा सोन्याची अंडी देणारा शो अचानक भरकटायला लागला.. नवीन इनोव्हेटीव कल्पना अचानक येणे बंद झाले आणि शो चा टीआरपी अचानक  घसरायला सुरवात झाली... प्रेक्षकांना कळलंच नाही कि ते कधी झी मराठी ची साथ सोडून दुसऱ्या चॅनल वर गेले... 
 ह्या सगळ्या घटनांच्या पाठी एक व्यक्ती होती, आणि त्या व्यक्ती चे नाव आहे "निखिल साने" ह्या माणसांनी जीवाचं रान करून झी मराठी उभा केला. त्याला जगाला कवेत घेण्याचं बळ दिले आणि जेंव्हा झी ला पंख फुटून ते उडायला लागलं,अगदी सात समुद्रापार त्याची मजल गेली तेंव्हा त्यांना ह्या माणसाचा जमिनीला धरून राहण्याचा हट्ट नकोसा झाला व आपल्याच जन्मदात्याला घराबाहेर काढण्याचे पाप झी मराठी च्या समूहाने घेतलं.. मुळात हे सांगणं कठीण आहे कि त्याला काढलं कि तो निघाला ... पण तो गेला हे नक्की ... 
    सूर नवा ध्यास नवा हा कार्यक्रम अचानक कलर मराठीवर दिसायला लागला .. लोकांना आवडायला लागला... चला हवा येउद्या च्या वेळे दरम्यानच तो कलर मराठीवर प्रदर्शित केला जाई. आणि आपला चला हवा येऊ द्याचा परदेश दौरा लोकांना बोर करू लागला होता .. फार योग्य वेळ होती झी चा प्राईम टाइम प्रेक्षक आपल्याकडे वळवण्याची.. कलर ला कसे कळलं कि हीच वेळ आहे... कारण आज झी समोर जो उभा होता तो होता झी चा जुना चाणक्य "निखिल साने" .. झी ला कल्पना होती याची.. पण हा आता हा काय काय करेल हे फक्त बघत बसने एवढेच होत त्यांच्या हाती. मग एक एक करता निखिल झी चे सगळे प्राईम टाइम शो कसे पाडता येतील ह्याची रणनीती आखू लागला.  
 सुरवात झाली ६:३० च्या होम मिनिस्टर पासून. गेलॆ १३ वर्ष हा शो रोज अखंड ह्या वेळेवर मराठी घरात चालू होतो.. दिवा बत्तीची हि वेळ. शुभंम करोति म्हणता म्हणता टीव्ही चालू केला जातो आणि भाऊजी येतात दार ठोकत.. ह्या शो मुळेच झी मराठी मराठी माणसाच्या घरात ह्या वेळेला चिटकून जात, रिमोटकडे हात जाताच नाही. कारण ह्या वेळेला घरात असलेला प्रेक्षक असतो मराठी घरातला होम मिनिस्टर. कुणाची आई तर कुणाची बायको घरातली काम सुरु करते आणि काम करता करता आदेश भाऊजींना आणि ते आलेल्या अनोळखी घराला बघत बसते.. कुणी काय  नेसलं आहे. काय काय दागिना घातला आहे.. बघत राहते बापडी... आता ह्या अश्या इमोशनल रिऍलिटी शो ला तुम्ही कसा काय सुरंग लावणार.. पण सुरवात तर केलीच पाहिजे  म्हणून निखिल ने "नवरा असावा तर असा" हा त्याच धाटणीतला एक रिऍलिटी शो सुरु केला... आता ह्याला भाऊजींची गंमत येणे शक्यच नाही पण जे भाऊजींनी सोडलेले होतं ६-७ वर्षा पुर्वी तेच निखिल ने पकडलं आणि एका वाहिनी ऐवजी दोन वहिनींना जुंपावल आणि शो सुरु केला... हळू हळू पॉइझन आपलं काम करेल.. ते काम आता त्यांनी वेळेवर सोडलं आणि झी च्या मुळात वार करण्याच्या योजना आखण्यास सुरवात केली.. 
इकडे झी वरचे काही शो सोडले तर ९ नंतरच्या प्राईम टाइम ला काही पर्याय मिळेनाच. झी दिवसेन दिवस आपला ऑडियन्स हरवत चालला पण कलर वर सुद्धा काही नवीन घडत नव्हतं.. सूर नवा चा एपिसोड ताणू लागला... निखिल चा सारा भरोसा पारंपरिक सेटअप वर असे. त्यांनी कलर च्या रंगमंचावरून सारे दिग्गज आणायला सुरवात केली.. झी चे बरेच जुने जाणकार तंत्रज्ञ, लेखक, कलाकार आता कलर च्या रंग मंचावर दिसू लागले.. पण तरी हि प्रेक्षकांशी सूत  काही जुळत नव्हतं. निखिल ने सुरेश वाडकर पासून ह्रिदयनाथ मंगेशकर पर्यन्त साऱ्या थोर कलावंतांना आपल्या स्टुडिओच्या आवारात आणुन थेट सरस्वतीलाच प्रसन्न करण्याचा प्रयत्न सुरु केला... पण नियती काही प्रसन्न होईना... आणि शेवटी त्यांना एंडोमॉल शाईन ह्या फ्रेंच ज्यू इल्युमिनाटी ला पुजणाऱ्या हैवानाची पूजा करावी लागली... शेकडो वर्षांपूर्वी कोकणातील खोत जे अघोरी कर्मकांडे करत असत ... तश्या कर्मकांडाच्या पूर्ण हवाली गेलेल्या एंडोमॉल शाईन बरोबर निखिल आणि कलर च्या टीम ने एक अघोरी करार केला आणि ना भूतो ना भविष्यती असा शो महाराष्ट्राच्या घरा घरा पर्यन्त पोहचवण्याचा कलर तव ने विडा उचलला. आणि सुरु झाला इल्युमिनाटीचा अघोरी खेळ "बिग बॉस मराठी" 
क्रमश: 

Comments